Saturday , May 25 2019
Home / topfive / महाराष्ट्रात लवकरच ४,७३८ शिक्षकांची पदे भरणार
income generating weekend homes

महाराष्ट्रात लवकरच ४,७३८ शिक्षकांची पदे भरणार

मुंबई :-महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्र शासन ‍शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाणार असून त्याचबरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त असल्याबाबत चर्चा ही सर्वदूर सुरु होती. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. अध्यापकांच्या ३,५८० जागा, शारिरीक शिक्षण संचालनालयातील १३९ जागा, ग्रंथपालांच्या १६३ जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८५६ जागा अशी एकूण ४,७३८ पदे येत्या काळात भरण्यात येतील असेही तावडे यांनी सांगितले.तसेच, तासिका तत्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून त्यामध्ये सुध्दा घसघशीत वाढ करण्यात आली आहे. महाविद्यालय व विद्यापीठातील ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

pune marketo ads

Check Also

मनपा निवडणूक;भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेला खुद्द देवेंद्र फडणवीस ७ डिसेंबरला नगरमध्ये

अहमदनगर-अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *