Saturday , May 25 2019
Home / topfive / मोठा अनर्थ टळला; विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात
income generating weekend homes

मोठा अनर्थ टळला; विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात

मुबई-२६/११ च्या हल्ल्याला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाले त्याची भीती अजूनही नागरिकांच्या मनामध्ये असतांना मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अनर्थ टळला. जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून फोनवर विमानाचा स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे आहे. जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून इतर प्रवाशांसह हा तरुण कोलकत्त्यावरून मुंबईला प्रवास करत होता. दरम्यान विमान उडण्याआधी या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. या तरुणाने चेहऱ्यावर काळा कपडा बांधला होता आणि विमानात स्फोट घडवून आणण्याबाबत तो समोरील व्यक्तीशी फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

9W0472 हे जेट तो उडवून टाकण्याबाबत ताब्यात असलेला आरोपी कोणा व्यक्तीशी बोलत होता. त्यामुळे हा नेमका कोणाशी बोलत होता, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरु आहे.ज्या नंबरवर तो बोलत होता त्याची चौकशी पोलीस करत आहेत. सोमवारी सकाळी 8:15 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर विमानात काही संशयास्पद वस्तू आहे का हे पाहण्यासाठी संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली होती.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *