Saturday , May 25 2019
Home / topfive / उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर
income generating weekend homes

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला जात असताना यामध्ये डाव्या संघटनाही कमी पडत नाहीत असे दृश्य आज मुंबईत दिसत आहे.मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ‘संविधान बचाव रॅली’ काढण्यात येणार आहे. या रॅलीत देशभरातील युवा संघटनांमधील महत्त्वाचे चेहरे दिसणार आहेत.

या ‘संविधान बचाओ रॅली’मध्ये १४ युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विदयार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यांचा देखील समावेश आहे.

यासोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर आणि काँग्रेसचे युवा नेते सहभागी होणार आहेत.
वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या चौदा प्रमुख युवा संघटना एकवटणार आहे. यूनायटेड यूथ फ्रंट’च्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या रॅलीला रविवारी दुपारी एक वाजता सुरूवात होणार आहे.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *