Thursday , June 20 2019
Home / topfive / ऐतिहासिक!मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर
income generating weekend homes

ऐतिहासिक!मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर

मुंबई- गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेल्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर गुरुवारी मोठ यश मिळाले आहे.राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले.मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC)हा विशेष व्रवर्ग तयार करून स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. त्यामुळे आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला आहे.मात्र मराठा समाजातील उन्नत व प्रगत गटातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण तसेच राज्याच्या लोकसेवांमधील पदांवर आणि प्रवेश नियुक्त्यांमध्ये 16 टक्के राखीव जागा मिळणार आहेत.आरक्षणासाठी विशेष प्रवर्ग तयार करुन मराठ्यांना आरक्षण दिले गेले आहे. यामध्ये अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था, अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षण मिळणार आहे.राज्याच्या नियंत्रणाखालील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देखील मिळणार आहे.

यावेळी केलेल्या कृती अहवालात काही विशेष बाबी अशा की,ओबीसी समाजाला धक्का न लावता हे आरक्षण दिले गेले आहे.मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध केले असून 9 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार फक्त उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना सदर आरक्षण मिळणार आहे.

pune marketo ads

Check Also

मोठा अनर्थ टळला; विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात

मुबई-२६/११ च्या हल्ल्याला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाले त्याची भीती अजूनही नागरिकांच्या मनामध्ये असतांना मंगळवारी …

One comment

  1. Very good article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *