Saturday , July 20 2019
Home / topfive / जसलीनने माझ्या प्रसिद्धीचा वापर केला, ती केवळ माझी शिष्य – अनुप जलोटा
income generating weekend homes
Anup-jalota-says-jasleen-used-my-populatity

जसलीनने माझ्या प्रसिद्धीचा वापर केला, ती केवळ माझी शिष्य – अनुप जलोटा

मुंबई – भजन सम्राट अनुप जलोटा नुकतेच ‘बिग बॉस १२’ शोमधून बाहेर पडल्यानंतर जसलीन मथारुसोबतच्या नात्याबद्दल एक विधान केले आहे. एका मुलाखतीत जलोटा यांना जसलीनच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले, की जसलीनने माझ्या प्रसिद्धीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मी एक सकारात्मक माणूस आहे. मला असे वाटते की मी कोणाला मदत करु शकत असेल तर काही विचार न करता मी पुढे येईल. माझे आणि तिचे कोणतेच नाते नाही आहे. ती केवळ माझी एक शिष्य आहे.

जसलीनच्या इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जेव्हा दाखविला गेला तेव्हा त्यात ती म्हणाली आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहे. हे ऐकून मी हैरान झालो. मी काही रिअॅक्ट करण्याआधी आम्हाला घरात पाठविले गेले. तेथे जाऊन मी विचार केला की आम्हाला एकत्र खेळायचे होते म्हणून तक्रार करणे योग्य नव्हते.  शोनंतर जसलीनसोबत कशाप्रकारचे नाते शेअर करण्यावर अनुप जलोटा यांनी सांगितले, आमच्यात काहीच बदल होणार नाही. मी माफी देण्यावर विश्वास ठेवतो. जर तिने माझ्या प्रसिद्धीचा वापर केला असेल, तर मी आनंदी आहे की यात ती यशस्वी झाली, असे विधान त्यांनी केले.

एका मुलाखतीत अनुप जलोटा यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले, बिग बॉसच्या घरातील अनुभव खूप चांगला होता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मला आठ तास झोपायला मिळायचे. खऱ्या आयुष्यात माझ्या कामामुळे हे अशक्य आहे.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *