Thursday , June 20 2019
Home / अ.नगर / भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य पदी भूषण थोरात
income generating weekend homes

भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य पदी भूषण थोरात

अहमदनगर-कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाच्या आय एम डी एस इंडिया विभागाच्या अहमदनगर आय टी सेक्टर हेड पदी भूषण राजाराम थोरात यांची चित्रपट दिग्दर्शक विराग वानखडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन निवड करण्यात आली.नुकताच नाशिक येथे झालेल्या आय एम डी एस विभागाच्या महिला सक्षमीकरण व उद्योजक पुरस्कारा दरम्यान थोरात यांची निवड करण्यात आली.यावेळी आय एम डी एस इंडिया विभागाचे अध्यक्ष अमोल शिंदे,संचालक विश्वजीत मुनेश्वर, संचालक योगेश शेलार, अहमदनगर आयएमडीएस विभाग जिल्हा संचालक गोविंद सोनावणे,बचत गट विभागप्रमुख विलास शिंदे आदी उपस्थित होते.
दरम्यान कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाच्या आय एम डी एस इंडिया विभागाच्या अहमदनगर जिल्ह्यातील आय टी सेक्टर विभागाअंतर्गत येणाऱ्या कॉम्पुटर कोर्सस सुरु करण्यासाठी किंवा नवीन केंद्र उभारणी बाबत सर्वतोपरी मदत करून सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी यामधून करून देणार असल्याची माहिती आय टी सेक्टर हेड भूषण थोरात यांनी दिली.त्याचबरोबर लवकरच नगरमध्ये आय एम डी एस इंडिया विभागामार्फत आय टी कंपनी सुरु करून आय टी क्षेत्रातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जाणारे आहे . त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

pune marketo ads

Check Also

नगर मनापा निवडणुकीत भाजपाला दिलासा ;“ते” चारही अर्ज वैध

अहमदनगर-महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या तब्बल चार उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी बाद करण्यात आले होते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *