Thursday , June 20 2019
Home / अ.नगर / नगर मनापा निवडणुकीत भाजपाला दिलासा ;“ते” चारही अर्ज वैध
income generating weekend homes

नगर मनापा निवडणुकीत भाजपाला दिलासा ;“ते” चारही अर्ज वैध

अहमदनगर-महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या तब्बल चार उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी बाद करण्यात आले होते. त्यात भाजपा खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह सुरेश खरपुडे,प्रदीप परदेशी या नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते.दरम्यान याविरुद्ध यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली असता आज सोमवारी याचा निकाल लागला असून ते चारही अर्ज वैध असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.यामुळे भाजपच्या नगर कार्यालयामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
भाजपाचे सुवेद्र गांधी यांनी प्रभाग क्रमांक 11मधून अर्ज दाखल केला होता, तर त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांनी प्रभाग 12मधून अर्ज दाखल केला होता. दोघांच्या अर्जावर अनुक्रमे गिरिश जाधव व संभाजी कदम यांनी आक्षेप घेतला होता.तर प्रभाग १२ मधून सुरेश खरपुडे व प्रभाग ९ मधून प्रदीप परदेशी यांनी केलेले उम्मेद्वारी अर्ज देखील वैध ठरलेले आहेत.

pune marketo ads

Check Also

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी रामचंद्र वाबळे

अहमदनगर- आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आण्णासाहेब वाबळे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *