Thursday , June 20 2019
Home / महाराष्ट्र

महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनचे अन्यायाविरोधात संपर्क साधण्याचे आवाहन

अहमदनगर-संपूर्ण देशा-विदेशात कार्यरत असणारी संघटना आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेने आजपर्यंत खूप अन्याय,अत्याचार विरुद्ध आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.अश्याच गोरगरीब व्यक्तीवर अन्याय झाल्यास त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अहमदनगर कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन कुरकुम येथे झालेल्या कार्यक्रमावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी केले.यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेचे …

Read More »

ऐतिहासिक!मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर

मुंबई- गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेल्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर गुरुवारी मोठ यश मिळाले आहे.राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले.मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC)हा विशेष व्रवर्ग तयार करून स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. त्यामुळे आजचा दिवस …

Read More »

मनपा निवडणूक;भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेला खुद्द देवेंद्र फडणवीस ७ डिसेंबरला नगरमध्ये

अहमदनगर-अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून झाला.भाजपने पहिल्याच टप्प्यात मंत्र्यांच्या हातून प्रचार,सभा,भाषणबाजी सुरु केली आहे.तर दुसऱ्या टप्प्यात देखील भाजपच्या ‘स्टार प्रचारकां’च्या प्रचारसभा होणार असून,यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, यासारखे दिग्गज नेते महापालिकेच्या …

Read More »

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

fire on tractor show room at pathardi

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत पहाटे भीषण आग लागून त्यात लाकडी सामान मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले़.भापकर पेट्रोल पंपाच्यामागे पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये शिरुरकर सॉ मिल ही पॅकिगचे मटेरियल तयार करणारी कंपनी आहे़.या कंपनीत पहाटे तीन वाजता अचानक आग लागली़.प्रसंगी कोणतीही …

Read More »

मोठा अनर्थ टळला; विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात

मुबई-२६/११ च्या हल्ल्याला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाले त्याची भीती अजूनही नागरिकांच्या मनामध्ये असतांना मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अनर्थ टळला. जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून फोनवर विमानाचा स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे आहे. जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून इतर प्रवाशांसह हा तरुण कोलकत्त्यावरून मुंबईला प्रवास …

Read More »

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी रामचंद्र वाबळे

अहमदनगर- आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आण्णासाहेब वाबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी नियुक्ती केली. अण्णासाहेब वाबळे हे नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी येथील रहिवासी असून ते कावीळीवरील आयुर्वेदिक औषध लोकांना देतात. त्यांच्या या औषधाने हजारो लोकांना फायदा …

Read More »

कोल्हापूरहून निघालेल्या मराठा मोर्च्यादरम्यान पोलीस आणि मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

कोल्हापूर-मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणी तसेच इतर मागण्यांकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता.दरम्यान सोमवारी दुपारी हा वाहन मोर्चा कोल्हापूर पोलिसांकडून शिरोली नाक्यावर अडवण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान पोलीस आणि मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. सकल मराठा समाजाच्या …

Read More »

….तर नगर शहर विकासासाठी सरकार ३०० कोटी देईल – रावसाहेब दानवे

(प्रतिनिधी-अजित घोडके) अहमदनगर – महानगरपालिका निवडणुकीच्या रणासंग्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फोडून भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपला सत्ता देऊन भाजपचा महापौर निवडून येताच मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत अहमदनगर शहरविकासासाठी ३०० कोटींचा निधी देईन , असे आश्वासन दानवे यांनी रविवारी नगरकरांना दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल …

Read More »

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला जात असताना यामध्ये डाव्या संघटनाही कमी पडत नाहीत असे दृश्य आज मुंबईत दिसत आहे.मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ‘संविधान बचाव …

Read More »

अयोध्येत २ लाखांची गर्दी; कडक बंदोबस्तात उद्धव ठाकरे होणार अयोध्येत दाखल

sanjay raut comment on ram temple

मुबई-अयोध्येत शनिवारी शिवसेनेचा कार्यक्रम असून रविवारी(२५नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आहे.या ठिकाणी ५ हजार शिवसैनिकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १ लाख आणि विश्व हिंदू परिषदेचे १ लाख कार्यकर्ते दाखल होणार आहेत.त्यामुळे अयोध्येत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अयोध्येत मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले शिवसैनिक, शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषद यांनी आयोजित …

Read More »