Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 3)

महाराष्ट्र

वर्धा येथे लष्करी तळावर बॉम्ब निकामी करताना स्फोट; ६ ठार

वर्धा – वर्ध्यात देवली तालुक्यात पुलगाव परिसरात लष्करी तळावर बॉम्ब निकामी करताना स्पोट होऊन ६ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे.मंगळवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या …

Read More »

विविध मागण्यांसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माळशिरस ते मुंबई पदयात्रा

माळशिरस-शिक्षण,रक्षण,आरक्षणाच्या ध्येयासाठी महाराष्ट्र राज्य मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी माळशिरस ते मुबई आझाद मैदान अशा पदयात्रा काढून मुंबईच्या दिशेने मागील दोन दिवसांपासून कूच केली आहे.महात्मा गांधीनी शेकडो किलोमीटर चा प्रवास करत जो लढा देशासाठी दिला त्याचाच उजाळा म्हणून माळशिरस ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत मुस्लीम …

Read More »

पुण्यात भरदिवसा व्यापाराला चाकूच्या धाकाने ५ लाखास लुटले

पुणे-दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी व्यापार्याीला चाकू गळ्याला लावून त्याचा धाक दाखवत ४ लाख ७४ हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना शहरात मंगळवारी दुपारच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात गंगाधाम चौक ते मार्केटयार्ड दरम्यानच्या बुधाणी कॉलनी जवळच्या गल्लीत ही खळबळजनक घटना घडली. भरदिवसा लुटीची घटना घडल्याने मार्केटयार्ड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यानंतर या घटनेची …

Read More »

दारूतस्करांचा प्रताप ! चंद्रपूर मध्ये पोलीस अधीक्षकांनाच स्कर्पिओखाली चिरडले

चंद्रपुर-नागभीड पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे या पोलीसाला अवैध दारू वाहून नेणाऱ्या स्कार्पियोने धडक दिली असून धडकेत छत्रपती चिडे यांचा जागीच मृत्यु झाला तर अवैध दारू घेऊन जाणारी स्कार्पियो फरार झाली.मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना चंद्रपूर जिल्हयातील मौशीजवळील गोसे खुर्द नहराजवळ घडली. . दरम्यान, दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्हयात …

Read More »

नात्याला काळिमा ! नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

नागपूर-पोटच्या सतरा वर्षाच्या मुलीवरच नराधम बापाने मागील तीन महिन्यांपासून अत्याचार केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील काटोला शहरात उघड झाली आहे. यासंदर्भात फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की,नागपूर जिल्ह्यात वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार …

Read More »

महाराष्ट्रात लवकरच ४,७३८ शिक्षकांची पदे भरणार

मुंबई :-महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्र शासन ‍शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाणार असून त्याचबरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे …

Read More »

वाकड पोलिसांचा अनोखा प्रताप;मयत व्यक्तीवरच केला गुन्हा दाखल

पुणे-गेल्या सहा महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पिंपरी चिंचवड पोलिसांनी केल्याची घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या सासरकडील नातेवाईकांमधील पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात मारहाण, शिवीगाळ, शिळं अन्न खायला देणं आणि जिवंत जाळण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केल्यावर वाकड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. परंतु …

Read More »

ऐन दिवाळीत पुणेकरांना पाणी नाही !

पुणे-ऐन दिवाळीत पुण्यात पाण्याचा तुटवडा भासणार आहे.गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या दौऱ्यामध्ये पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. परंतु शुक्रवारी सायंकाळपर्यंत या संदर्भातील कोणत्याची सूचना अथवा लेखी पत्र महापालिका प्रशासनाला मिळाल्या नाहीत. यामुळे सध्या तरी पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच जाणार असल्याचे वृत्त समोर येत …

Read More »

अखेर ‘त्या’ नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात वनविभाला यश

यवतमाळ – नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश आले आहे. मागील दीड वर्षापासून १३ जणांचा बळी घेणाऱया T१ वाघिणीला ठार करण्यात आले आहे. यावेळी ही वाघीण आक्रमक झाल्याने अंगावर चालून आल्याने तिला शूट करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.  दरम्यान, …

Read More »

सुरेश हावरे यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल

अहमदनगर –दोन दिवसापूर्वी शिर्डी येथे साई संस्थानाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला होता दरम्यान संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्याविरोधात शुक्रवारी १७ जणांवर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १६ जणांवर दंगलीचा, तर एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. …

Read More »