Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 31)

महाराष्ट्र

मराठा आंदोलकांवरील कारवाई सुडाची, तात्काळ गुन्हे मागे घ्या – धनंजय मुंडे

मुंबई –  राज्यात मराठा समाजाने शिक्षण व सरकारी नोकऱ्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनातील अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना …

Read More »

मराठा समाजासोबतच मुस्लीम समाजालाही आरक्षण द्या – खा. ओवेसी

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभा जोरात सुरू आहेत. घऱात कोणी मिठी मारायला नसले की, अशीच मिठी मारावी लागते, अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. घरात मिठी मारायला कोणी नसले की अशीच मिठी मारावी लागते, अशा शब्दात त्यांनी राहुल …

Read More »

मराठा आंदोलनात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू; चाफळ येथे तणाव

सातारा – मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलना दरम्यान जखमी झालेल्या रोहन तोडकर (वय २१, मु. चाफळ खोनोली, ता. पाटण) या तरुणाचा आज मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे झालेल्या दगडफेकीत रोहन जखमी झाला असून डोक्याला गंभीर इजा झाली होती. जे. …

Read More »

नांदेडमध्ये मराठा आंदोलकाचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न; पोलिसांवर दगडफेक

नांदेड – मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटले आहे. या आंदोलनाने नांदेडमध्ये हिंसक वळण घेतले आहे. मराठा आंदोलकाने जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडविले असता, पोलिसांवर दगडफेक झाली. यामध्ये दहा ते पंधरा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस वाहनावर झालेल्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, औरंगाबाद जिल्हा परिषदेचा ठराव

औरंगाबाद – राज्यात मराठा आरक्षण आंदलनाने उग्र रूप धारण केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मराठा आमदारांच्या राजीनामा सत्रानंतर आता मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत पास करण्यात आला आहे.  औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे सर्वच जण अचंबित झाले आहेत. मराठा आंदोलनाच्या …

Read More »

परभणीत आणखी एका तरूणाने घेतले मराठा आरक्षणासाठी विष

emergency-in-mumbai-is-not-closed

परभणी –  मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणखी एका तरूणाने विष घेतल्याची घटना समोर आली आहे. राम गायकवाड (१८) असे विष घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.  तो परभणी तालुक्यातील वाडी दमइ येथील रहिवासी आहे. परभणीच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. …

Read More »

मराठा आरक्षणासाठी आमदार चिकटगावकर यांचा राजीनामा

औरंगाबाद – मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात आता मराठा आमदार उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यानंतर आता वैजापूरचे राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना मेलद्वारे …

Read More »

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा; नाहीतर आमदारकीचा राजनामा देईन

आमदार हर्षवर्धन जाधव यांचा सरकारला अल्टीमेट औरंगाबाद – मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहे. आंदोलनाचा दुसरा बळी गमावल्यानंतर मराठा आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आमदाराना लक्ष्य केलं जातं आहे. मात्र आता कन्नडचे आमदार मराठा आरक्षणासाठी …

Read More »

जगन्नाथ सोनावणे यांचा मृत्यू; मराठा आंदोलनाचा दुसरा बळी

emergency-in-mumbai-is-not-closed

औरंगाबाद – राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा आज आणखी एक बळी गेला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे, यासाठी एकाने गोदावरी नदीत उडी मारुन जीव दिला. त्यानंतर आज मराठा आंदोलनाचा आणखी एक बळी गेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी विष घेतलेल्या जगन्नाथ सोनावणे याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. …

Read More »

खड्डे बुजवण्यासाठी गणेशोत्सवाची वाट कशाला पहाताय; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले

bobmay-high-court-on-Dj-dolbi

मुंबई – पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबई – गोवा राष्टीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी गणेशोंत्सवाची वाट कशाला पहात आहात. या महामार्गावर केवळ गणेशोत्सवातच वाहतूक होते का? असा संतप्त व्यक्‍त करून उच्च न्यायालयाने आज पुन्हा राज्य सरकारला धारेवर धरले. या महामार्गावर पावसामुळे केवळ 7 कि.मी. रस्त्यावर खड्डे आहेत. वाहने सावकाश चालवावी लागत आहे. या महामार्गावरील …

Read More »