Saturday , July 20 2019
Home / topfive / सुनंदा पुष्कर हत्याकांडावर आधारित चित्रपटात दीपिका साकारणार शशी थरूर यांच्या पत्नीची भुमिका?
income generating weekend homes
deepika-padukone-play-role-of-sunanda-pushkar-in-upcoming movie

सुनंदा पुष्कर हत्याकांडावर आधारित चित्रपटात दीपिका साकारणार शशी थरूर यांच्या पत्नीची भुमिका?

मुंबई – लवकरच काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये थ्रिलर आणि बायोपिक सिनेमांना मिळणारा प्रतिसाद पाहता दिग्दर्शक शिवमनेही मर्डर मिस्ट्री असलेला एक चित्रपट आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आयुष्यावर आधारित असणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात सुनंदा पुष्कर यांच्या पात्रासाठी दीपिकाच्या नावाची चर्चाही आहे.

सुनंदा पुष्कर हत्याकांडावर असलेला हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असून एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार लवकरच या चित्रपटासाठी दीपिकासोबत चर्चा करणार असल्याचे शिवमने म्हटले आहे.

सुनंदा पुष्कर हत्याकांड प्रकरण – 

सुनंदा पुष्कर यांचा शशी थरुर यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही वर्षांतच सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील आढळून आला होता. सध्या या खुनाचा खटला दिल्ली न्यायालयात सुरु आहे. शशी थरुर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या याच गूढ कथेभोवती हा चित्रपट फिरणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात शशी थरुर यांची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्यापही उघड झालेले नाही.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *