Thursday , June 20 2019
Home / अ.नगर / मनपा निवडणूक;भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेला खुद्द देवेंद्र फडणवीस ७ डिसेंबरला नगरमध्ये
income generating weekend homes

मनपा निवडणूक;भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेला खुद्द देवेंद्र फडणवीस ७ डिसेंबरला नगरमध्ये

अहमदनगर-अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून झाला.भाजपने पहिल्याच टप्प्यात मंत्र्यांच्या हातून प्रचार,सभा,भाषणबाजी सुरु केली आहे.तर दुसऱ्या टप्प्यात देखील भाजपच्या ‘स्टार प्रचारकां’च्या प्रचारसभा होणार असून,यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, यासारखे दिग्गज नेते महापालिकेच्या प्रचार सभेत उतरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर ७ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांनी प्रचाराची सांगता होणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला धडाक्यात सुरुवात करणाऱ्या भाजपाने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यातही प्रचाराचे चोख नियोजन केले आहे. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील ‘स्टार प्रचारकां’च्या प्रचारसभा आणि रोड शोजच्या माध्यमातून शहरातील वातावरण भाजपमय करण्याची रणनिती आखण्यात आली आहे. येत्या ९ डिसेंबरला मतदान होणार असल्याने तोपर्यंत भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते प्रचारात सहभागी होणार आहेत.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *