Saturday , July 20 2019
Home / पुणे / गणेशोत्सवाची तयारी : गणेश मंडळांनी घेतले आपत्ती व्यवस्थापन अन वैद्यकीय सेवेचे धडे
income generating weekend homes
ganesh festival disaster management

गणेशोत्सवाची तयारी : गणेश मंडळांनी घेतले आपत्ती व्यवस्थापन अन वैद्यकीय सेवेचे धडे

पुणे – शहरातील स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात सुरू असलेल्या एका कार्यक्रमात एका युवकाला येवून तो खाली कोसळला. गर्दीतून आवाज आला कोणीतरी रुग्णवाहिकेला फोन करा… फोन करा. पण रुग्णवाहिका येईपर्यंत करणार काय? हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. त्याचवेळी काही तरुण पुढे आले आणि त्यांनी त्या युवकाला शुद्धीवर आणण्यासोबतच प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली. तेवढयात रुग्णवाहिका आली आणि स्ट्रेचरवर त्या युवकाला रुग्णवाहिकेपर्यंत घेवून जाण्याचे काम या तरुणांनी केले. अगदी खरी वाटावी, अशी ही घटना आणि तरुणांनी यथायोग्यपणे हाताळलेली परिस्थिती पुणेकरांनी अनुभवत आपत्ती व्यवस्थापन व वैद्यकीय सेवेचे धडे घेतले.

आम्ही पुणेकर, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ, हुतात्मा बाबूगेनू मंडळ, श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक, इच्छापूर्ती गणेश मंदिर, नॅशनल युनियन ऑफ जर्नालीस्ट, महाराष्ट्र या संस्थांतर्फे ढोल-ताशा पथकातील वादक, पोलीस कर्मचारी, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, अग्निशामक दलाचे जवान, पोलीस मित्र, गिर्यारोहक आणि पत्रकारांसाठी गणेशोत्सवात आपत्ती व्यवस्थापन व वैद्यकीय सेवा प्रशिक्षण देण्यात आले.

स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, श्रीनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, डॉ. राजेंद्र जगताप, उमेश झिरपे, डॉ. दिलीप शेठ, मनोज पंडित, विवेक खटावकर, बाळासाहेब मारणे, केतन देशपांडे, हेमंत जाधव, नगरसेवक योगेश समेळ, डॉ. वेदव्यास मोरे, प्रियंक जावळे, अरविंद जडे, शिल्पा देशपांडे, सुषमा पाटील आदी उपस्थित होते. बी.व्ही.जी.च्या सोसायटी ऑफ इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिसेस (डायल १०८) यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी बोलताना मुक्ता टिळक म्हणाल्या, देशातील नागरिकांसह परदेशी नागरिकांनाही पुण्याच्या गणेशोत्सवाचे आकर्षण आहे. त्यामुळे बाहेरुन येणा-या सर्वच नागरिकांना मदत करण्याचे आपले काम आहे. उत्सवात मोठी गर्दी होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गरदोर महिला, लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असते. तसा त्रास झाल्यास काय करावे, हे आपल्याला सुचत नाही. त्यामुळे उत्सवात सहभागी तरुणांना आपत्ती व्यवस्थापन व वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण मिळाल्यास याचा नक्कीच फायदा होईल.

डॉ. सागर डोईफोडे म्हणाले, नैसर्गिक व मानवनिर्मीत अशा दोन प्रकारच्या आपत्ती असतात. त्यामध्ये माणसाचा जीव वाचविणे हे महत्त्वाचे आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणे हे केवळ शासनाचे काम आहे, असे नाही. तर, सामान्यांनी देखील पुढे येऊन मदतीचा हात द्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले. राजर्षि शाहू प्रतिष्ठान, राजमुद्रा पथक, गजलक्ष्मी पथक, तुळशीबाग मंडळ, गरुड गणपती मंडळ, शिवसूर्य प्रतिष्ठान, इच्छापूर्ती गणेश मंदिर, सृजन इन्स्टिटयूट यांसह विविध पथके, मंडळे आणि संस्थांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. पोलादपूर घाटात येथे झालेल्या दुर्घटनेत मदत करणारे गिर्यारोहक आणि मंडळांना प्रथमोपचार पेटया देखील देण्यात आल्या. डॉ. शैलेश गुजर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

pune marketo ads

Check Also

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *