Saturday , July 20 2019
Home / topfive / कोल्हापूरहून निघालेल्या मराठा मोर्च्यादरम्यान पोलीस आणि मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
income generating weekend homes

कोल्हापूरहून निघालेल्या मराठा मोर्च्यादरम्यान पोलीस आणि मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

कोल्हापूर-मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणी तसेच इतर मागण्यांकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता.दरम्यान सोमवारी दुपारी हा वाहन मोर्चा कोल्हापूर पोलिसांकडून शिरोली नाक्यावर अडवण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान पोलीस आणि मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईला सोमवारी वाहन मोर्चा काढण्यात येणार होता .मात्र त्याआधीच रविवारी अचानक पोलिसांनी मोर्चाच्या नियोजनातील प्रमुख मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतल्याचे तीव्र पडसाद उमटले. या कारवाईच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी सोमवारचा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत निघणार, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. मोर्चा अडवण्याचा किंवा दडपशाहीचा प्रयत्न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच मराठा समाजातील तरुण व प्रमुख कार्यकर्ते दसरा चौकात जमा झाले. ताब्यात घेतलेल्यांना सोडा, या मागणीसाठी या कार्यकर्त्यांनी दसरा चौकातच ठाण मांडले. या कारवाईच्या विरोधात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी सरकार, मुख्यमंत्री, पोलिस अधीक्षकांबरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही तीव्र निषेध करण्यात आला.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *