Saturday , July 20 2019
Home / topfive / ‘पुणे१ न्युज’चे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते उद्घाटन  
income generating weekend homes

‘पुणे१ न्युज’चे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते उद्घाटन  

भावी वाटचालीसाठी पुणे१ न्युजला दिल्या शुभेच्छा

पुणे – माध्यम क्षेत्रातील नव्या रूपात आलेल्या पुणे१ न्युज चॅनलचे उद्घाटन गुरूवारी माजी आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण, पुणे मार्केटोचे अभिषेक खरोसेकर आदी उपस्थित होते.

नव्याने सुरू झालेले पुणे१ न्यूज हे एक ऑनलाइन न्यूज चॅनल आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, खेळ अशा सर्व प्रकारच्या बातम्या प्रसारित होणार आहेत. ‘परिवर्तन हेच ध्येय’ या उक्तीप्रमाणे समाजात बदल घडवून आणणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 

चॅनलला शुभेच्छा देताना विनायक निम्हण म्हणाले की, हे चॅनेल पुणेकरांचा विश्वास संपादन करेल. लोकांना हवे असेल ते देण्याचा प्रयत्न हे पोर्टल करेल असा आशावाद ही त्यांनी यावेळी व्यक्त करत भावी वाटचालीसाठी पुणे१ न्युजच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

pune marketo ads

Check Also

मोठा अनर्थ टळला; विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात

मुबई-२६/११ च्या हल्ल्याला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाले त्याची भीती अजूनही नागरिकांच्या मनामध्ये असतांना मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *