Saturday , July 20 2019
Home / topfive / टिंडरला टक्कर देण्यासाठी फेसबुक सज्ज; लॉन्च केले मोफत डेटींग अॅप
income generating weekend homes
facebook-dating-app-against-rival-tinder-goes-live-know-features-and-difference-between-them

टिंडरला टक्कर देण्यासाठी फेसबुक सज्ज; लॉन्च केले मोफत डेटींग अॅप

पुणे – ऑनलाईन डेंटीग अॅप म्हणून प्रसिद्धी असलेल्या टिंडर अॅपला आता स्पर्धा करावी लागणार आहे. कारण आता फेसबुक आपले डेटींग अॅप लॉन्च केले आहे. फेसबुकचे डेटींग अॅप टिंडरला टक्कर देण्यास सज्ज झाले आहे.

हे आहेत फेसबुकच्या डेटींग अॅपचे वैशिष्टे –

फेसबुकने लॉन्च केलेले डेटींग अॅप  पुर्णपणे मोफत असणार आहे. फक्त मोबाईल धारकांनाच याचा वापर करता येणार आहे. डेस्कटॉप यूजर्सन याचा फायदा होणार नाहीये. डेटींग प्रोफाईल हे वेगळे असणार आहे. तसेच डेटींगचं हे फीचर पूर्णपणे पर्यायी राहणार आहे. वापरकर्त्यांची प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी फेसबुक एका व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाईलचा वापर केवळ व्यक्तीचं नाव आणि वय जाणून घेण्यासाठीच करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच आपल्या मित्र परिवारातील कोणालाही किंवा वापरकर्त्यांच्या संबंधित कोणत्याही व्यक्तीला तुम्ही डेटींग करत आहात हे कळणार नाही याची काळझी अॅप मध्ये घेण्यात आली आहे. सध्या कोलंबियामध्ये याची प्राथमिक सुरवात करण्यात आली आहे. १८ वर्षावरील लोक या सेवेचा फायदा घेवू शकणार आहेत.

अशी आहे फेसबुक डेटींग अॅपची प्रोसेस –

फेसबुक डेटींग अॅप वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ही सेवा घेण्यासाठी एक वेगळं डेटींग प्रोफाईल तयार करण्यास सांगितले जाणार आहे. त्यानंतर त्यात तुम्हाला तुमच्याबाबत माहिती द्यावी लागेल. एक प्रोफाईल फोटो, खाजगी माहिती सोबतच काही खाजगी प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतील. हे प्रोफाईल फेसबुक प्रोफाईलपेक्षा वेगळं असणार आहे. यानंतरच तुम्हाला फेसबुक डेटींग अॅपचा वापर करता येणार आहे.

एका प्रसारमाध्यमांशी बोलताना फेसबुकच्या प्रॉडक्ट मॅनेजर नॉथन शार्प म्हणाल्या की, गेली अनेक दिवस आम्ही पाहत आहोत की डेटींग ही अशी गोष्ट आहे की,  फेसबुकवर ती खुप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत होती. त्यामुळे आम्ही फक्त त्याचे रूपांतर साध्यात केले आहे. कारण आम्हाला वाटले के त्यासाठी हीच वेळ योग्य आहे.

 

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *