Thursday , June 20 2019
Home / Uncategorized / पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण
income generating weekend homes
fire on tractor show room at pathardi
संग्रहीत छायाचित्र

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत पहाटे भीषण आग लागून त्यात लाकडी सामान मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले़.भापकर पेट्रोल पंपाच्यामागे पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये शिरुरकर सॉ मिल ही पॅकिगचे मटेरियल तयार करणारी कंपनी आहे़.या कंपनीत पहाटे तीन वाजता अचानक आग लागली़.प्रसंगी कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे.दरम्यान आगीचे कारण अजून स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशामक दलाला पहाटे तीन वाजता या आगीची माहिती मिळाली़.
बुधवारी सकाळी कंपनी बंद असता ही घटना घडली. यावेळी कंपनीत रखवालदारही दिसून आले नाहीत़. अग्निशामक दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या़ होत्या.मोठ्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी तळाला जो लाकडाचा सांगाडा तयार केला जातो़, त्याचे काम या कंपनीत केले जाते़. सुमारे १० हजार स्क्वेअर फुटच्या आवारात ही आग लागली होती़.अग्निशामक दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने पहाटे ५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले़. येथे मोठ्या प्रमाणावर लाकडी फळ्या ठेवण्यात आल्या आहेत़. आगीत त्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या़. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग अधिक पसरून नेणे व चांगल्या मालापर्यंत पोहचू नये, म्हणून काळजी घेतल्याने तयार माल आगीपासून वाचला आहे़. लाकडी फळ्यांना आग लागून त्याचे निखारे झाले असल्याने अधून मधून त्यातून धूर येत आहे़. जेसीबीच्या सहाय्याने या जळालेल्या फळ्या बाजूला करुन त्यांना विझविण्याचे काम बराच वेळ सुरु होते.

pune marketo ads

Check Also

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा महीला सरचिटणिस पदी रेश्मा शितोळे

(प्रतिनिधी-अलीम सय्यद) दौंड-तालुक्यातील कुरकुंभ गावचे महिला पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *