Saturday , July 20 2019
Home / topfive / Happy B’day गुगल : यशाची उत्तुंग झेप घेत गुगल २० वर्षात प्रत्येकाच्या हृदयात
income generating weekend homes
happy bday google

Happy B’day गुगल : यशाची उत्तुंग झेप घेत गुगल २० वर्षात प्रत्येकाच्या हृदयात

आज प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा आपला मित्र म्हणजे गुगल. हा गुगल आज २० वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे. गूगलच्या वाढदिवसावरुन सुरु असलेल्या वादाला आज पूर्ण विराम मिळणार आहे. १९९८ साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. मात्र, तरीही तारखेवरुन कायमच वाद झाला. त्यानंतर २७ सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्या हिशोबाने आज गूगलचा २० वा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाचे गुगलने खास डुडल बनविले आहे. या  डुडलच्या व्हिडीओत शेवटी गुगलने आभार मानले आहेत.

४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. तुम्हाला माहित आहे का, गूगलच्या स्पेलिंग मिस्टेकमागील किस्सा? खरंतर आताच्या ‘Google’चं नाव Googol ठेवायचं होतं. एकावर शंभर शुन्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे ‘Google’ असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं बरं त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले.

२००२ साली गूगलने पहिल्यांदा डूडल तयार केलं. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गूगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करतं. गूगल जगभरात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन आहे. भारतात गुगल डॉट को डॉट इन ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे. माहितचं सगळ युग गुगलने आपल्यात सामावून घेत जगापुढे माहितचे मायाजाल खुलं केल आहे. मागील २० वर्षांत यशाची उत्तुंग झेप घेतली आहे.

 

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *