Thursday , April 25 2019
Home / अ.नगर / आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनचे अन्यायाविरोधात संपर्क साधण्याचे आवाहन
income generating weekend homes

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनचे अन्यायाविरोधात संपर्क साधण्याचे आवाहन

अहमदनगर-संपूर्ण देशा-विदेशात कार्यरत असणारी संघटना आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेने आजपर्यंत खूप अन्याय,अत्याचार विरुद्ध आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.अश्याच गोरगरीब व्यक्तीवर अन्याय झाल्यास त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अहमदनगर कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन कुरकुम येथे झालेल्या कार्यक्रमावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी केले.यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किरण लांडगे,महाराष्ट्र राज्य महासचिव दीपक चौधरी,पुणे जिल्हाध्यक्ष अलीम सय्यद उपस्थित होते.

तसेच लवकरात लवकर संघटनेचे काम खेडोपाडी वाढवण्याचे आदेश आपल्या सर्व जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील पदाधिकार्यांना प्रदेशाध्यक्ष शेख यांनी दिली आहेत.खाजगी सावकार,वीटभट्टी,मालक गुंड,विविध शासकीय योजनांपासून वंचित ठेवणारे अधिकारी व कर्मचारी पोलिस व न्यायालयीन कोठडीत होणारे मृत्यू बेकायदेशीर महिलांवरील अत्याचार व शोषण दलित समाजात होणारे अत्याचार व अन्याय सर्व शासकीय कार्यालयांमध्ये होणारी अडवणूक या सर्व बाबींमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असते अश्या अन्याय झाल्यास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अफसर शेख (मोब-८६०५४९७३३३)यांच्याशी थेट संपर्क करावा असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष शेख यांनी केले आहे.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *