Saturday , May 25 2019
Home / topfive / जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
income generating weekend homes
inauguration-of-statue-of-unity-by-PM-narendra-modi

जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली – आज सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा आज (३१ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित केले. मोदींना देशात एक-एक राज्य जोडणाऱ्या महापुरुषाला भाषणातून नमन केले.

यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार पटेलांच्या भव्य पुतळ्याचे भव्य उद्घाटन झाले. तर स्पेशल इफेक्टसच्या माध्यमातून विमानातून पुतळ्यावर पुष्पवृष्टी आणि तिरंग्याच्या रंगांतील फुलांचा हार अर्पण करण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी गुजरातीमधून सर्वांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह व्यासपीठावर उपस्थित होते.

ही आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटीची वैशिष्टे – 

– ७ मजली इमारतीएवढी चेहऱ्याची उंची
– ७ फूट हात, ८५ फुटांपेक्षा अधिक पायांची उंची
– १ व्यक्तीच्या उंचीएवढे मोठे ओठ, डोळे, शर्टची बटणे
– स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या जवळ फ्लावर व्हॅली आहे, यामुळे या पुतळ्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *