Thursday , June 20 2019
Home / खेळ / उद्या पुण्यात रंगणार भारत-विंडीज एकदिवसीय सामना
income generating weekend homes
India-vs-Windies-3rd-ODI-in-pune

उद्या पुण्यात रंगणार भारत-विंडीज एकदिवसीय सामना

पुणे – भारत आणि विंडीज दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना उद्या शनिवारी पुण्यात खेळला जाणार आहे.  भारत दौऱ्यावर आलेला विंडीजचा संघ उद्या पुण्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. शनिवारी दुपारी १.३०  वाजता गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना खेळण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज या मालिकेत पुण्यात आणि मुंबईत प्रत्येकी एक एकदिवसीय सामना खेळणार आहे.

आतापर्यंत पुण्याच्या या मैदानावर १ कसोटी, ३ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले गेले आहेत. त्याचबरोबर इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) ३२ सामनेही या मैदानावर खेळले गेले आहेत.

 

 

pune marketo ads

Check Also

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *