Thursday , June 20 2019
Home / खेळ / रोहीत, विराटचा झंझावात, भारताचा विंडीजवर दणदणीत विजय
income generating weekend homes
india win first match vs. west indies

रोहीत, विराटचा झंझावात, भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

गुवाहाटी – भारत विरुद्ध विंडीज पहिला एकदिवसीय सामना बारसपुरा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे झाला. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३२३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने विराट कोहलीचे शतक आणि रोहित शर्माच्या दीडशतकाच्या बळावर भारताने विंडीजचा धुव्वा उडवला.

विंडीजच्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे शतकाच्या बळावर भारताने विंडीजला आठ गड्यांनी नमवले. भारताने ४७ चेंडू राखून हा विजय मिळवला. डावाच्या सुरुवातीपासूनच भारताने विंडीजच्या गोलंदाजावर आक्रमण करत सामना एकतर्फी केला. विराट कोहली आक्रमक फलंदाजी करत १०७ चेंडूत १४० धावा काढून बाद झाला. त्याने या खेळीत २१ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्याने रोहित शर्मासोबत मिळून २४६ धावांची विक्रमी भागीदारी केली. विराट बाद झाल्यानंतर रायडूसोबत रोहितने ५६ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ११७ चेंडूत १५२ धावा करत विजयी षटकार मारुन संघाचा विजय निश्चित केला. त्याचे हे कारकीर्दीतील २०वे शतक ठरले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.

pune marketo ads

Check Also

prathavi shaw first century

‘पृथ्वी शॉ’चे पदार्पणातच दमदार शतक, मुंबईत फटाक्यांची आताषबाजी

राजकोट – भारत-वेस्ट इंडिज यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू पृथ्वी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *