Saturday , July 20 2019
Home / topfive / भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; कुलदीप यादवने केला निम्मा संघ गारद
income generating weekend homes
india won first test match

भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; कुलदीप यादवने केला निम्मा संघ गारद

राजकोट – पहिल्या डावात भारताने ६४९ धावांचा डोंगर उभा करत सांघिक कामगिरीच्या जीवावर वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २७२ धावानी विजय मिळवला. दुसऱ्या डावात कुलदीप यादवने केलेल्या भेदक माऱ्या समोर वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांमध्ये गारद झाला. या विजयासह भारताने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा वेस्ट इंडिजविरूध्दचा सर्वात मोठा विजय आहे.

भारताने पहिल्या डावात ६४९ धावांचा डोंगर रचला होता. वेस्ट इंडिजचा मात्र पहिला डाव १८१ धावांवर खुर्दा झाला.  त्यात आर. अश्विनने ३७ धावां देऊन ४ फलंदाजांना माघारी धाडले. रोस्टन चेस या एकमेव खेळाडूला अर्धशतक ठोकता आले. रोस्टनने ५४ धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी १९६ धावा केल्या. केरन पॉवेलने सामन्यात तडाखेबंध अर्धशतकी खेळी केली, त्यात ६ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता.  विंडीजच्या इतर फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केले. कुलदीप यादवने ५ बळी घेत विंडीजच्या संघाचे कंबरडे मोडले. आर. अश्विनने त्याला सुरेख साथ दिली.  पहिल्या डावात अश्विनच्या फिरकीचे कोड सोडवता आले नाही. त्याने पहिल्या डावात  ४ फलंदाजाना माघारी धाडले.  भारतीय फलंदाजानी पहिल्या डावात उभे केलेल्या धावांच्या बळावर वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवण्यात यश आले.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *