Saturday , July 20 2019
Home / topfive / अॅपलच्या सर्वात स्वस्त आयफोन एक्सआरची भारतात शुक्रवारपासून विक्री
income generating weekend homes
iPhone-XR-preorder-begins-on-friday.

अॅपलच्या सर्वात स्वस्त आयफोन एक्सआरची भारतात शुक्रवारपासून विक्री

नवी दिल्ली – येत्या शुक्रवारपासून (१९ ऑक्टोबर) भारतात अॅपलच्या सर्वात स्वस्त आयफोन एक्सआरची विक्री सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याची किंमत ७६ हजार ९०० रुपये आहे. कंपनीने गुरुवारी (१८ ऑक्टोबर) माहिती देताना सांगितले, की आयफोन एक्सआर २६ ऑक्टोबरपासून अॅपलच्या अधिकृत स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे.

६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी, असे तीन मॉडेल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. ब्लॅक, व्हाईट, ब्ल्यू, येल्लो, रेड आणि कोरल या रंगामध्ये हे मॉडेल्स बाजारात येणार आहेत. या फोनची बॉडी ग्लास आणि अॅल्युमिनियमची बनली असून डिस्प्ले ६.१ इंचीचा आहे.

यासह लग्झरी आयफोन एक्सएस आणि एक्सएस मॅक्स पण लाँच झाला आहे. अॅपलचे म्हणणे आहे, की या फोनची बॅटरी पूर्ण दिवस चालणार आहे. त्यामुळे भरपूर बॅटरी बॅकअप ग्राहकांना मिळणार आहे. आयफोन एक्सआरमध्ये १२ एमपीचा रिअर कॅमेरा आणि ७ एमपीचा फ्रंट कॅमेरा असून सेंसर्सही लागले आहेत. हा फोन वॉटरप्रूफ असून कॉफी, चहा किंवा सोडा हे पेय यावर पडल्यासही फोन खराब होणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *