Thursday , June 20 2019
Home / topfive / युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८ : भारताचा वेटलिफ्टर जेरमीला ऐतिहासिक सुवर्णपदक
income generating weekend homes
jeremy win gold medal

युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८ : भारताचा वेटलिफ्टर जेरमीला ऐतिहासिक सुवर्णपदक

ब्युनोस आयरिस – युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा वेटलिप्टर जेरमी लालरिननुगाने सुवर्ण पदक पटकावले आहे. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत जेरेमीने ६४ किलो वजनी गटात एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रौप्यपदक व सुवर्णपदक जिंकले होते. मिझोरमच्या या १५ वर्षीय वेटलिफ्टिंगपटूने सुवर्णमय कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने स्नैच मध्ये १२४ किलोचे वजन उचलले होते.   लालरिननुगाने युवा आशिया स्पर्धेत रजत पदक जिंकून दोन विक्रम केले होते.

जेरमीने या मुकाबल्यात तुर्कीच्या टॉपटस कानेर आणि कोलंबियाच्या विलर एस्टिवन यांना मात देत सुवर्णपदक पटकावले. त्याने एकूण २७४ किलो  (१२४ किलो +१५० किलो)  वजन उचलले. तर कानेरने २६३ किलो (१२२ किलो+१४४ किलो) आणि एस्टिवनने २६० किलोग्राम (११५ किलो+१४३ किलो) वजन उचलले.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *