Saturday , July 20 2019
Home / लाईफस्टाईल / जाणून घ्या वजन कमी करण्याचा अन् त्वचेच्या सौंदर्याचा संबंध
income generating weekend homes

जाणून घ्या वजन कमी करण्याचा अन् त्वचेच्या सौंदर्याचा संबंध

हल्ली धावपळीच्या जगात अनेक जणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होवून वजन वाढते. त्यामुळे अनेक पुरुष झटपट वजन कमी करण्याच्या नादात आरोग्यावर प्रभावित करणाऱ्या अनेक गोष्टी करताना दिसतात. प्रमाणात वजन कमी करत गेल्यास शरीर त्यानुसार जुळवून घेते. परंतु वजन कमी करण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर त्याचा त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा सैल आणि निस्तेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेमका वजन आणि शरीराची त्वचा यांचा नेमका काय संबंध आहे जाणून घ्या…

आपली त्वचा चमकदार आणि एकदम फ्रेश राखण्यासाठी पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. तुम्ही दररोज आठ ग्लास पाणी प्यावे. पणते प्रमाणाबाहेर नसावे. कारण शरीरात असलेले महत्त्वाचे इलेक्ट्रोलाईट्स आणि क्षारांचे मिश्रण विरघळण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी आहार कमी चरबीचा असतो. यामुळे शरीरातील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्वचाकोरडीफिक्की आणि निस्तेज होणे टाळण्यासाठी एखाद्या मॉइश्चरायझरचा वापर करावा.

वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम करतात. यामुळे रक्ताभिसरणामध्ये वाढ होऊन त्वचेचा टोन सुधारतो. तसेच घाम येऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.

शरीरात कोलेजन हा आवश्यक घटक बनवण्यासाठी क जीवनसत्व महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा चिरतरुण दिसते. तसेच त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. यासाठी क जीवनसत्वाचा आहारात समावेश करा.

pune marketo ads

Check Also

facebook-dating-app-against-rival-tinder-goes-live-know-features-and-difference-between-them

टिंडरला टक्कर देण्यासाठी फेसबुक सज्ज; लॉन्च केले मोफत डेटींग अॅप

पुणे – ऑनलाईन डेंटीग अॅप म्हणून प्रसिद्धी असलेल्या टिंडर अॅपला आता स्पर्धा करावी लागणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *