Saturday , July 20 2019
Home / पुणे / सरकारच्या मदतीमुळे उस उत्पादक व कारखानादारीला चांगले दिवस – राहुल कुल
income generating weekend homes
mla rahul cool comment on sugar production

सरकारच्या मदतीमुळे उस उत्पादक व कारखानादारीला चांगले दिवस – राहुल कुल

(प्रतिनिधी – अलीम सय्यद) 

दौंड – केंद्र सरकर व राज्यसरकार ऊस उत्पादक व साखर कारखान्याचे हित लक्षात घेवून ठामपणे पाठीशी राहीली. सरकारने मदत केल्याने ऊस उत्पादक व साखर कारखानदारीस चांगले दिवस आले आहेत. यामुळे यंदाचा चालू गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सर्व तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती कारखान्याच्या ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली.

दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसधारण सभा शनिवारी (ता.२९) कारखाना स्थळावर पार पडली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी या सभेची माहिती सभासदांना दिली. तर सभेचे प्रस्ताविक भाषणात कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल म्हणाले की, कारखाना अंत्यत प्रतिकुल पपरिस्थितून वाटचाल करीत आहे. कारखान्यावर असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे एक हंगाम बंद करावा लागला. मात्र सध्या कारखान्याने आर्थिक परिस्थितीवर मात केली आहे.

राज्य व केंद्र सरकारने मदत केल्याने कारखान्याचे गाळप हंगाम चालु करता आला आहे. साखरच्या दरावर ऊसाचे दर अवलंबुन असतात शासनाकडून साखरचे दर निश्चित होत नसल्याचे एफआरपी प्रमाणे ऊसाचे दर देणे अवघड होते. त्यामुळे साखरेला किमान हमी भाव मिळाला पाहिजे. सरकार ऊस उत्पादकाच्या व कारखानादारांच्या पाठीशी उभे राहिल्याने यंदाचा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालु करण्यासाठी सर्व तयारी पुर्ण झाली आहे. कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद, तोडणी कामगार, तांत्रिक कामे आदींचे नियोजन झाले आहे. यामुळे यंदा गाळप हंगामाचा अडचण येणार नाही. कारखान्याचा इथेनाल प्रकल्प ही चांगला चालविण्यासाठी प्रयत्न आहे. कारखाना पुर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन अध्यक्ष राहुल कुल यांनी यावेळी सभासदांना दिले. दरम्यान, कार्यकरी संचालक निबे यांनी विषयापत्रिकेवरील वाचनास सुरवात केली. विषय पत्रिकेवरील एकुण नऊ ठराव यासभेत शांतेत मंजुर करण्यात आले. ऎन वेळेच्या विषयावर अनेक सभासदांनी अध्यक्षांना विविध विषयांवर प्रश्न विचारत धारेवर धरले. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष कुल यांनी उत्तरे देत सभासदांना आश्वासने दिली. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

pune marketo ads

Check Also

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *