Thursday , June 20 2019
Home / अ.नगर / मुस्लीम आरक्षणासाठी जमिअत ए उल्मा हिंद संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
income generating weekend homes

मुस्लीम आरक्षणासाठी जमिअत ए उल्मा हिंद संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

(प्रतिनिधी-अजित घोडके)
अहमदनगर-मुस्लिम समाजाला शासकीय तसेच निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी जमिअत ए उल्मा हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेचे अहमदनगर जिल्हा जनरल सेक्रेटरी सय्यद खलील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाने येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केले.व अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्ह्या जनरल सेक्रेटरी सय्यद खलील अब्दुल करीम, शौकत तांबोळी, मौलाना अनवर नदवी,पत्रकार आबिद खान,हाजी नजीर अहमद(नज्जू पहेलवान)निसार बागवान, राजु भाई शेख, कादीर सर, नसिर अब्दुला, मौलाना कादिर,शफी जहागीरदार,मौलाना जुबेर,सैय्यद अमीर,नईम सरदार, मुस्तफाखान,कासम केबलवाले, अब्दुल रहीम,फैयाज भाई तांबोळी, डॉक्टर सादिक, फारूक कुरेशी, एकबाल हबीब, जावेद मास्टर, शालम जागीरदार, आबीद दुलेखान, आदिंसह मुस्लिम समाजाच्या मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मुस्लीम कष्टाळू ,लहान-सहान व्यवसाय, हस्त व्यवसाय, शेती व्यवसाय, मजुरी व परंपरागत व्यवसाय करतात राज्यातील 85 टक्के मुस्लिम समाज आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. सरकारी नोकरीत त्यांचे प्रमाण दोन ते अडीच टक्के आहे. शिक्षणातील त्यांचे प्रमाण पाच ते सहा टक्के आहे तेही प्राथमिक स्तरावर आहे. त्यांचा सर्वच क्षेत्रातील मागासलेपणा न्यायाधीश रंगनाथ मिश्रा व न्यायाधीश सच्चर आयोगाने शासकीय पुरावे आणि सप्रमाण सिद्ध केले आहे. मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी या आयोगाने शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाची शिफारस संविधानातील तरतुदीनुसार केलेली आहे. अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडून सरकारचे लक्ष वेधवण्यात आले..

pune marketo ads

Check Also

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी रामचंद्र वाबळे

अहमदनगर- आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आण्णासाहेब वाबळे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *