Saturday , July 20 2019
Home / topfive / ‘नाळ’ चित्रपटातील ‘चैत्या’ने निरागस अभिनयाने पाडली नेटकऱ्यांवर कमालीची छाप
income generating weekend homes
nagraj munjale upcoming movie naal

‘नाळ’ चित्रपटातील ‘चैत्या’ने निरागस अभिनयाने पाडली नेटकऱ्यांवर कमालीची छाप

लहान मुलांचे विश्व आणि त्यांची निरागसता नागराज मंजूळे यांच्या आगामी ‘नाळ’ चित्रपटात पहावयास मिळणार आहे. चित्रपटातील ‘चैत्या’ या बालकलाकाराने ती निरागसता दिसून येते. त्याच्या निरागस अभिनयाने नेटकऱ्यांवर कमालीची छाप पाडली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेण्डिंग बनला आहे. आत्तापर्यंत लाखो प्रेक्षकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.

नाळ चित्रपटातील या बालकलाकाराचे नाव आहे श्रीनिवास गणेशराव पोकळे. वयाच्या अवघ्या दोन वर्षांपासून त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.  या चित्रपटात त्याने ‘चैतन्य’ या लहान मुलाचे पात्र साकारले आहे, मात्र त्याला सर्व ‘चैत्या’ याच नावाने हाक मारत असतात. ‘चैत्या’चे ‘आई मला खेळायला जायचंय जाऊ दे नं वं’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्याने तर चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. या गाण्यात श्रीनिवासचे निरागस रुप पाहायला मिळाले आहे.

नागराज मंजूळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच रिलीज झाला. यातील बालकलाकाराने प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या करून दिल्या. लवकरच नागराज मुंजळेंचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *