Saturday , July 20 2019
Home / करिअर / ‘बॉस’ला अशी कारणे कधीच देवू नका…
income generating weekend homes

‘बॉस’ला अशी कारणे कधीच देवू नका…

तुमच्या बोलण्यावरुन आपले व्यक्तिमत्व दिसून येत असते. त्यामुळे ज्यावेळी आपण ऑफिसच्या कामासंबंधी वरिष्ठांशी, आपल्या बॉसशी बोलताना आपल्या बोलण्यातून आपली व्यावसायिकता दिसून येत असते. त्यामुळे इतरांचे तुमच्याबद्दल मत तयार होत असते. यामुळे बॉस जरी तुमचा मित्र असला तरी त्याच्याशी संवाद साधताना तुमचे वर्तन हे नेहमी व्यावसायिक असायला हवे. त्याच्याशी बोलताना या गोष्टी अवश्य टाळा.

हे काम मला नव्हते सांगितले – अमूक हे काम मला सांगितले नव्हते. त्यामुळे मी केले नाही. असे बॉसला कधीही सांगू नका. ऑफिसचे काम हे टीमवर्क असते. त्यामुळे असे हेवेदावे करू नका. तुमचे काम वेळेत संपवून तुम्ही पुढील कामाला सुरुवात करणे अपेक्षित असते. तुम्हाला सांगून काम करून घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होता कामा नये.

यात माझी काही चूक नाही – कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे एक टीम म्हणून पाहिले जाते. स्वत:ची चूक लपवून त्या चुकीसाठी टीममधील अन्य कोणास जबाबदार धरणे हे बरोबर नाही. असे करून तुम्ही काही काळासाठी वाचू शकता,पण प्रत्येक वेळी ते शक्य नाही. चुकीचा स्वीकार केल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढतो.

मी आता व्यस्त आहे – सध्या मी व्यस्त असून हे काम करू शकत नाहीअसे बॉसला कधीही सांगू नका. जर तुम्ही खरेच व्यस्त असाल तर त्याचे कारण सांगा. तसेच तुम्ही ते काम संपण्याची वेळही सांगू शकता. यामुळे तुम्ही विश्वासास पात्र राहाल.

हा माझा प्रॉब्लेम नाही – कर्मचारी वरिष्ठ पदावर जात असताना त्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होत असते. कठीण प्रसंगी अथवा जास्त काम असताना प्रत्येकाला कनिष्ठ कर्मचाऱ्याची मदत घ्यावी लागते. अशा एखाद्या प्रसंगी जर बॉसला तुमच्या मदतीची अवश्यकता भासलीतर याच्याशी मला काही घेणे-देणे नाही अथवा हा माझा प्रॉब्लेम नाही असे उत्तर देऊ नका.

हे काम नाही होणार – बॉसने तुम्हाला एखादे काम करण्यास सांगितल्यास त्यास नकार देऊ नका. शिवाय कारणेही सांगू नका. जर तुमच्याकडे खूप कामे असतील तर कोणते काम अगोदर पूर्ण करणे गरजेचे आहे याबाबत  विचारणा करा. समजदार बॉस नक्कीच तुमची मदत करेल.

pune marketo ads

Check Also

railway recruitment department appeal to candidate

तब्बल ४७.५३ लाख उमेदवार देणार रेल्वेच्या २६ हजार ५०२ जागांसाठी परीक्षा

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेत तब्बल २६ हजार ५०२ जागांसाठी परीक्षा होणार आहे. ९ ऑगस्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *