Saturday , July 20 2019
Home / पुणे / पांढरेवाडी ग्रामपंचायत ग्रामसभेत गदारोळ
income generating weekend homes

पांढरेवाडी ग्रामपंचायत ग्रामसभेत गदारोळ

(प्रतिनिधी-अलीम सय्यद)
दौंड-तालुक्यातील पांढरेवाडी येथील ग्रामपंचायतच्या विकास कामांच्या दर्जा संदर्भात ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे ग्रामपंचायत ग्रामसभेत गदारोळ झाला.पांढरेवाडीची ग्रामसभा मंगळवारी(दि.१३)रोजी आयोजित करण्याचे ठरले होते.परंतु ग्रामसभा अपुऱ्या कोरममुळे तहकूब झाल्याने ती पुन्हा गुरुवारी पार पडली.पांढरेवाडी गावातील विकास कामात मागील विकास कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने बांधकाम विभाग या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याने ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची समक्ष भेट घेऊन या संदर्भात लेखी तक्रार अर्ज करून या विकास कामांच्या दर्ज्याची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी अर्जाद्वारे मांगणी करण्यात आल्याने ग्रामसभेत हा विषय बऱ्याच वेळ गाजल्याने हा विषय वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात यावी अशी मांगणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.यावेळी गावचे सरपंच छाया झगडे,उपसरपंच नितीन जाधव,ग्रामसेविका आश्लेषा रोकडे, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते
दरम्यान मागील सभेच्या कामकाजाचा वृत्तांत ( प्रोसिडिंग) वाचून कायम करणे, सन २०१९- २०२० च्या अंदाज पत्रकाचेवाचन करणे , करवसुली बाबत चर्चा करणे , नवीन घर नोंदीबाबत चर्चा करणे , १४ वा वित्त आयोग सन २०१९-२० चा आराखडा तयार करणे , १४ वा वित्त आयोग सन२०१६- १७ व २०१७-१८ च्या आराखड्यातील कामात बदल करणेबाबत चर्चा करणे , दलित वस्ती जाहीर करन्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्यात आली तसेच ऐन वेळेच्या आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी सद्या पांढरेवाडी गावासाठी पिण्यासाठी येणारे पाणी खराब येत असल्याने ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा विषय घेतल्याने गावातील सर्व टाक्यांच्या खाली फिल्टर प्लांट बसवावे असा सर्वांमते ठराव मंजूर करण्यात आला व दुष्काळा संदर्भात शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावी , पांढरेवाडी गावासाठी जानाई शिरसाई योजनेतून पाणी सोडावे , तसेच चारा डेपोची मांगणी करण्यात आली या विषयी ग्रामपंचायत ठराव वरिष्ठांना पाठवून मांगणीची पूर्तता करण्यात यावी.

pune marketo ads

Check Also

पुण्यातील चंदननगर भागात घरात घुसून महिलेवर गोळीबार

पुणे-पुण्यातील चंदननगर भागांत महिलेवर घरात घुसून दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.यामध्ये जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *