Saturday , July 20 2019
Home / खेळ / पुणे १० के इनटेनसिटी रन स्पर्धेत प्रियांका, चंद्रकांत यांनी मारली बाजी
income generating weekend homes
priyanka win pune 10k run in women category

पुणे १० के इनटेनसिटी रन स्पर्धेत प्रियांका, चंद्रकांत यांनी मारली बाजी

पुणे – बालेवाडी क्रीडा संकुलात रविवारी पार पडलेल्या पुणे १० के इनटेनसिटी रनच्या सिझन २ मध्ये महिला एलिट रन गटात प्रियंका चावरकर तर पुरुष एलिट रन गटात चंद्रकांत मनवाडकर यांनी बाजी मारली.

पुणे १० के इनटेनसिटी रनने गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरस कामगिरी केली. विविध क्षेत्रातील सहभागी धावपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे ४००० उपस्थितांनी गर्दी केली होती. एलिट १० किलोमीटरची दौड ही या कार्यक्रमातली सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा असते. आपल्या लौकिकाला साजेशी अशी ही स्पर्धा पार पडली. विजेतेपद मिळवलेल्या प्रियांका आणि चंद्रकांत यांनी अनुक्रमे ४१:०५ मिनिटे आणि ३१:५५ मिनिटे ही वेळ नोंदवली.

सुरुवातीला, पुणे १० के इनटेनसिटी रन मध्ये पुणेरी पलटण संघातील खेळाडू गिरीष एर्नाक आणि अक्षय जाधव यांच्यासह राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेते कृष्णकुमार राणे आणि खुल्या पाण्यातील जलतरणपटू रोहन मोरे यांच्यासह ऑलिम्पिकपटू आणि माजी धावपटू आनंद मेंझेस यांनी या स्पर्धेला सुरुवात केली.

ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत जुई डोंगरे आणि जयभय दत्तात्रय यांनी विजेतेपद मिळवले. पुण्यानंतर हा कार्यक्रम हैद्राबाद येथे होणार असून तिथे तो २८ ऑक्टोबर २०१८ रोजी होण्याची शक्यता आयोजकांकडून सांगण्यात आली आहे. या मॅरेथॉनला अॅथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडिया, पुणेरी पलटण आणि एफसी पुणे सिटी यांचे पाठबळ लाभलेले असून यामध्ये पुण्यापासून सुरुवात होऊन पाच वेगवेगळ्या राज्यांतील सहा शहरे समाविष्ट आहेत. एम्स (AIMS) प्रमाणित या कार्यक्रमात धावपटू १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि २ किलोमीटर अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला.

 यावेळी बोलताना १०के इनटेनसिटी रनचे प्रवर्तक आणि ऑलिम्पिकपटू आनंद मेंझेस म्हणाले, “पुणेकरांच्या लक्षणीय उत्साहाकडे बघताना पुण्यात यशस्वी मॅरेथॉनचं आयोजन करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना बघून खूप आनंद होत आहे. राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांतील स्पर्धकांशी येथील स्पर्धक निश्चितच चांगला लढा देऊ शकतील अशी मला खात्री आहे. भारताने अॅथलेटीक्स सारख्या खेळांकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि पुणे यात महत्वाची भूमिका पार पडू शकते. एक ऑलिम्पिकपटू म्हणून मी जेव्हा लहान मुलं आणि तरुणांमध्ये खेळाविषयीची आणि धावण्याच्या स्पर्धेविषयीची आस बघतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो.

पुणेरी पलटण स्टार खेळाडू गिरीष एर्निक याने पुणेकरांच्या उत्साहाला आणि इतक्या लवकर उठून येण्याच्या चिकाटीला सलाम केला. तर पुण्याहून सुरुवात झालेली १० के इनटेनसिटी रन स्पर्धा पुण्यापाठोपाठ हैद्राबाद, बंगळूरू, मुंबई, चेन्नई इथे होणार असून त्याचा शेवट २४ फेब्रुवारी २०१९ रोजी कोलकाता येथे होणार आहे.

निकाल –

एलिट महिला १० किलोमीटर: १) प्रियांका चावरकर ४१:०५ मिनिटं, २) स्वाती व्हानवडे ४१:३२ मिनिटं  ३) नयन किरदार ४१:५९.

एलिट पुरुष १० किलोमीटर – चंद्रकांत मनवाडकर ३१:५५ मिनिटं  २)धर्मेंद्र कुमार यादव  ३२:०० मिनिटं  ३)प्रल्हाद राम सिंग ३३:१७ मिनिटं,

२ किलोमीटर फ्युचर चॅम्पियन स्पर्धा: मुले: १) महादेव कुंभार  २)प्रथमेश होळकर  ३)अभिषेक साखरे   मुली: १)श्रीजा रेड्डी   २)वगीशा कुमार   ३) अनन्या सिरकी

 ज्येष्ठ महिला  १)जुई डोंगरे   २)स्वाती अगरवाल   ३) राजश्री

पुरुष: १) जयभय दत्तात्रय   २)संतोष वाघ   ३)जे. मुथूकृष्णन

pune marketo ads

Check Also

india won first test match

भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; कुलदीप यादवने केला निम्मा संघ गारद

राजकोट – पहिल्या डावात भारताने ६४९ धावांचा डोंगर उभा करत सांघिक कामगिरीच्या जीवावर वेस्ट इंडिजवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *