Saturday , July 20 2019
Home / topfive / कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याला पुणे१ न्यूजचा सलाम…(पहा व्हिडीओ)
income generating weekend homes

कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याला पुणे१ न्यूजचा सलाम…(पहा व्हिडीओ)

आजपासून बरोवर १९ वर्षापुर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल येथे युद्ध झाले. १८ हजार फूट उंचीवर कारगिल मध्ये भारतीय सैन्य प्राणार्पणाने लढले. अतिशय दुर्गम भागात जवळपास २ महिने चाललेल्या या युद्धात ५२७ जवानांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली.

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी तिरंगा फडकावत या युद्धात विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकला.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यावेळी पाकिस्तानने घुसखोरी करून नियंत्रण रेषा भेदण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ हाती घेत पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

त्यामुळेच आज मोठ्या दिमाखात कारगील यद्धात आपला प्राण गमावलेल्या जवानांची आठवण तसेच भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंद दिवस म्हणून २६ जुलै रोजी कारगील विजय दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पुणे१ न्यूजच्या वतीने कारगील युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्याला तसेच शहिद जवानांना सलाम. भारतीय जवानांना कारगील विजय दिवसाच्या शुभेच्छा…..तमाम भारतीय जनतेला अभिमान आहे भारतीय जवानांच्या शौर्याचा…

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *