Thursday , June 20 2019
Home / अ.नगर / आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी रामचंद्र वाबळे
income generating weekend homes

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी रामचंद्र वाबळे

अहमदनगर- आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आण्णासाहेब वाबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी नियुक्ती केली.

अण्णासाहेब वाबळे हे नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी येथील रहिवासी असून ते कावीळीवरील आयुर्वेदिक औषध लोकांना देतात. त्यांच्या या औषधाने हजारो लोकांना फायदा झालेला आहे.संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक त्यांच्याकडे येत असतात.त्यामुळे वाबळे यांचा जनसंपर्क जास्त असल्याने तसेच नेवासा तालुक्यात देखील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे वाबळे समाजसेवा करत असतात त्यामुळे प्रदेशाध्यक्ष शेख यांनी त्यांच्या नावाची निवड केली आहे. तसेच सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या अन्यायावर वाबळे यांनी आवाज उठवावा यासाठी संघटना खंबीरपणे पाठीशी उभा राहून मदत केरल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष शेख यांनी यावेळी दिले.
यावेळी नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच भेंडा फॅक्टरी गावतील ग्रामस्त उपस्थित होते. त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करत ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

pune marketo ads

Check Also

मनपा निवडणूक;भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेला खुद्द देवेंद्र फडणवीस ७ डिसेंबरला नगरमध्ये

अहमदनगर-अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *