Thursday , June 20 2019
Home / अ.नगर / ….तर नगर शहर विकासासाठी सरकार ३०० कोटी देईल – रावसाहेब दानवे
income generating weekend homes

….तर नगर शहर विकासासाठी सरकार ३०० कोटी देईल – रावसाहेब दानवे

(प्रतिनिधी-अजित घोडके)
अहमदनगर – महानगरपालिका निवडणुकीच्या रणासंग्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फोडून भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपला सत्ता देऊन भाजपचा महापौर निवडून येताच मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत अहमदनगर शहरविकासासाठी ३०० कोटींचा निधी देईन , असे आश्वासन दानवे यांनी रविवारी नगरकरांना दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल चढवला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात दानवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली, यानंतर शहरातून दुचाकीची भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर सावेडी उपनगरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना दानवे यांनी महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात देण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी व्यासपीठावर दानवे यांच्यासह पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, पक्ष निरीक्षक सुरजित सिंग ठाकूर, अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुनील रामदासी आदी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीत भाजपने सर्व प्रभागात (६८) उमेदवार दिलेले आहेत. ते सर्व या विजय संकल्प मेळाव्यास यावेळी पस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना दानवे म्हणाले, आपण गेल्या ४ वर्षात राज्यातील १५ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा नारळ फोडला असून या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. आपल्या हाताला यश असल्यामुळेच अहमदनगर महानगर पालिकेमध्येही भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन महापौर भाजपचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या दिवशी शहराचा महापौर विराजमान होईल, त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत नगरमध्ये सभा घेऊन शहर विकासासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे आश्वासन दानवे यांनी आपल्या भाषणात दिले.
दानवे पुढे बोलताना म्हणाले की,विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे केवळ निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आघाडी सरकारने आपल्या १५ वर्षाच्या सत्ता काळात कोणताही विकास केला नाही आणि गेल्या ४ वर्षातील भाजपचे देवेंद्र फडवणीस सरकारच्या कामगिरीमुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळत असल्याचा दावा दानवेंनी यावेळी केला.

पालक मंत्री राम शिंदे यांनी आपल्या भाषणात भाजपामध्ये एकी असल्याचा दावा करत व्यासपीठावर खासदार दिलीप गांधी, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सुनील रामदासी यांच्यासह आपण स्वतः उपस्थित असून पक्ष एकदिलाने काम करत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शहर आणि उपनगरातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

pune marketo ads

Check Also

मनपा निवडणूक;भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेला खुद्द देवेंद्र फडणवीस ७ डिसेंबरला नगरमध्ये

अहमदनगर-अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *