Thursday , June 20 2019
Home / पुणे / महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा महीला सरचिटणिस पदी रेश्मा शितोळे
income generating weekend homes

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा महीला सरचिटणिस पदी रेश्मा शितोळे

(प्रतिनिधी-अलीम सय्यद)
दौंड-तालुक्यातील कुरकुंभ गावचे महिला पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा महीला सरचिटणिस पदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.२८ )रोजी आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येणाऱ्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटना व महिला आघाडी कार्यकारिणी , सदस्य सर्व पदाधिकारी तसेच सर्व तालुका अध्यक्ष यांची बैठक शुक्रवारी पार दौंड तालुक्यातील बोरमलनाथ मंदिर सभागृह, चौफुला येथे आयोजित केली होती. या बैठकीच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावचे पोलीस पाटील रेश्मा शितोळे यांची संघटनेच्या पुणे जिल्हा महीला सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महीला अध्यक्ष पुणे जिल्हा तृप्ती मांडेकर, दौंड तालुका अध्यक्ष निळकंठ थोरात तसेच यावेळी दौंड तालुका पोलीस पाटील संघटनेचे सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.यावेळी कुरकुंभ गावातून त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.

pune marketo ads

Check Also

पुण्यातील चंदननगर भागात घरात घुसून महिलेवर गोळीबार

पुणे-पुण्यातील चंदननगर भागांत महिलेवर घरात घुसून दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.यामध्ये जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *