Saturday , July 20 2019
Home / पुणे / येत्या ९ ऑगस्ट रोजी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे अवयवदान जनजागृती कार्यक्रम
income generating weekend homes
rotary district 3131 organised organ donation drive

येत्या ९ ऑगस्ट रोजी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे अवयवदान जनजागृती कार्यक्रम

पुणे   अवयवदान करून दुस-याला जीवनदान देणे हे दुस-याच्या देहातील अवयवरूपाने जीवनाचा अनुभव घेण्यासारखे आहे. अवयवदान हा शब्द अनेकांना संजीवनी देणारा ठरतो. विशेषतः महत्त्वाच्या मुख्य अवयवांचा प्रश्‍न जेव्हा निर्माण होतो, त्यावेळी अवयवदानाला अतीव महत्त्व येतं. हे महत्व ओळखून आपल्याबरोबर जो इतरांसाठी जगला तो खऱा जगला…या उक्तीप्रमाणे रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ने अवयवदान जागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी आपला सहभाग नोंदवून अवयवदान जनजागृती या उपक्रमाची चळवळ बनवण्याचे आवाहन रोटरी गांधीभवनच्या अध्यक्षा अमृता देवगावकर यांनी केले आहे.

अमृता देवगावकर यांनी अवयवदान उपक्रमाविषयी ‘पुणे१ न्युज’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे येत्या ९ ऑगस्टरोजी अवयदानाची प्रतिज्ञा घेवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी आपण www.giftlife.co.in या संकेतस्थळावर जावून अवयवदानाची शपथ घेवू शकतो.

गेल्या अनेक दिवसांपासून रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ कडून अवयवदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हा उपक्रम एक चळवळ बनावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांद्वारे चालवलेल्या या मोहिमेला आता यश प्राप्त होऊ लागले आहे. अवयवदानासाठी नागरिक स्वत:हून पुढाकार येत आहे.  रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ ने हाती घेतलेल्या या उपक्रमात अनेक सामाजिक संस्था, हॉस्पिटल, कॉलेज, कंपन्या सहभागी होत आहेत. चला तर मग आपणही या उपक्रमात सहभागी होवून, अवयव दानाबाबत जनजागृतीकरून करूया जीवनदान देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न…..

pune marketo ads

Check Also

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *