Saturday , July 20 2019
Home / लाईफस्टाईल / पावसाळ्यात रहा तंदुरूस्त…या ७ गोष्टींचे करा सेवन…
income generating weekend homes

पावसाळ्यात रहा तंदुरूस्त…या ७ गोष्टींचे करा सेवन…

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कामाच्या व्यापात आपले शरीर निरोगी ठेवणे एक आव्हान बनले आहे. त्यातच पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. याकरिता आपल्या आहारावर आपण विशेष लक्ष देत असतो. आपल्या जीवनशैलीमध्ये थोडाफार बदल केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होऊ शकते. यासाठी पावसाळ्यात या सात गोष्टींचे नियमित सेवन करा.

तुळशीचे पान – तुळस ही रक्तासंबंधित रोगतापखोकलाजंतू निवारक तसेच हृदयासाठी अत्यंत लाभदायक आहे. पांढऱ्या तुळशीचे पान खाल्ल्याने त्वचा व हाडाचे रोग दूर होतात. काळ्या तुळशीचे सेवन केल्याने पांढऱ्या डागापासून मुक्तता मिळते. तुळशीचा चहा प्यायल्याने तापपित्तआळसापासून सुटका होते.  तुळशीची पाने खाल्ल्यास भूक वाढण्यास मदत होते. तुळशीची उत्कृष्ट औषधी वनस्पती अशी ओळख आहे.

लिंबू – ‘‘,’‘,’ ‘ या जीवनसत्त्वांचा समावेश लिंबामध्ये असतो. तसेच सोडियमपोटॅशिअमतांबेमॅग्नेशिअम,फॉस्फरसक्लोरिनलोह हे घटकही लिंबामध्ये आढळून येतात. ‘ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकार शक्तीत वाढ होऊन शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

मध – रोजच्या आहारात मधाचा समावेश करणे आपल्या आरोग्यास लाभदायक आहे. कारणमधात अँटीऑक्सिडन्ट व अँटीबायोटीक तत्त्वे असतात. नियमित मधाचे सेवन केल्याने  जास्तीत जास्त ऊर्जा मिळते. साखरेच्या तुलनेत मधात कमी कॅलरीज असतात. तसेच ‘ब-1’, ‘ब-2’, ‘ब-6’ आणि ‘क’ जीवनसत्त्व असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

चहा (हर्बल) – यामध्ये ‘सिट्रॉल’ नावाच्या अँटीऑक्सिडन्टचा समावेश असल्याने अनेक प्रकारच्या जंतूसंसर्गापासून सुटका मिळते. तसेच पोटाचे विकारही दूर होतात. शिवाय रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासही हर्बल चहा फायदेशीर ठरतो. तुम्ही चवीसाठी आलंमिरे आणि मधाचा वापरही करू शकता.

सुकामेवा – ई जीवनसत्त्व आणि झिंक यांचा समावेश असल्याने सुकामेवा हा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो. यामुळे रोजच्या आहारात साधारण मुठभर सुका मेवा असणे गरजेचे आहे. याचे सेवन केल्याने आपले शरीर निरोगी राहते तसेच बदलत्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होत नाही.

कारले –  प्रथिनेकार्बोहायड्रेटफॉस्फरसकॅल्शियम आदींचा समावेश कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. नियमित कारल्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध राहण्यासह हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. श्वसनासंबंधित रोगांसाठी तसेच दमा असणाऱ्या व्यक्तींनी कारल्याचे नियमित सेवन करावे. कारल्यामुळे पचनशक्ती वाढते तसेच यकृतासंबंधित रोगांपासून मुक्तता मिळते.

लसूण – रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक तरी पाकळीचे सेवन केल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तर भाजलेला लसूण खाल्ल्यास पोटातील घाण स्वच्छ होते. लसूण हा एक नैसर्गिक अजैविक घटक असल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.  

pune marketo ads

Check Also

facebook-dating-app-against-rival-tinder-goes-live-know-features-and-difference-between-them

टिंडरला टक्कर देण्यासाठी फेसबुक सज्ज; लॉन्च केले मोफत डेटींग अॅप

पुणे – ऑनलाईन डेंटीग अॅप म्हणून प्रसिद्धी असलेल्या टिंडर अॅपला आता स्पर्धा करावी लागणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *