Saturday , July 20 2019
Home / topfive / अयोध्येत २ लाखांची गर्दी; कडक बंदोबस्तात उद्धव ठाकरे होणार अयोध्येत दाखल
income generating weekend homes
sanjay raut comment on ram temple

अयोध्येत २ लाखांची गर्दी; कडक बंदोबस्तात उद्धव ठाकरे होणार अयोध्येत दाखल

मुबई-अयोध्येत शनिवारी शिवसेनेचा कार्यक्रम असून रविवारी(२५नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आहे.या ठिकाणी ५ हजार शिवसैनिकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १ लाख आणि विश्व हिंदू परिषदेचे १ लाख कार्यकर्ते दाखल होणार आहेत.त्यामुळे अयोध्येत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अयोध्येत मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले शिवसैनिक, शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषद यांनी आयोजित केलेली धर्मसभा यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून राज्य सरकारने शहरातील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीला राज्यातील इतर शहरांतील पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. याशिवाय जलद कृती दल आणि राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

आरएसएसचे कार्यकर्ते १,३२२ बसगाड्या आणि १,५४६ चारचाकी वाहने, १४ हजार मोटरसायकल्सवरून अयोध्येत दाखल होत आहेत. तर १५ हजार कार्यकर्ते रेल्वेतून येणार आहेत.

अयोध्येत होणारी विश्‍व हिंदू परिषदेची धर्मसभा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला विरोध करणार्‍या व्यापारी संघटनांनी आपली भूमिका शुक्रवारी रात्री बदलली. शिवसेना उत्तर भारतीयांच्या विरोधात असल्याचा त्यांचा गैरसमज दूर करण्यात आल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यासह इतर सर्व नेत्यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अयोध्येतील तणाव निवळला आहे.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *