Saturday , July 20 2019
Home / topfive / व्हाॅट्सअॅपवरून मेसेज फाॅरवर्ड करण्यावर आता बंधने; फक्त ५ संदेश होणार फॉरवर्ड
income generating weekend homes
whatsapp-will-come-with-these-two-new-features

व्हाॅट्सअॅपवरून मेसेज फाॅरवर्ड करण्यावर आता बंधने; फक्त ५ संदेश होणार फॉरवर्ड

पुणे – व्हाॅट्सअॅपवरून मेसेज फाॅरवर्ड करणाऱ्यांवर आता बंधने येणार आहेत.  भारतात व्हाॅट्सअॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फाॅरवर्ड करता येईल, त्याची अमंलबजावणी या आठवड्यापासून सुरू झाली आहे. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यामुळे केंद्र सरकारने खडेबोल सुनावल्याने व्हाॅट्सअॅपने हे पाउल उचलले आहे.

भारतात जवळपास 20 कोटी वापरकर्ते असून सगळ्यांना हे बंधन घालण्यात आलं आहे. व्हाॅट्सअॅप कसे वापरायचे अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काय करता येईल याची माहिती देणारा एक व्हिडिओ या कंपनीने तयार केला. तो  या आठवड्यात व्हाॅट्सअॅप वापरणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

भारताव्यतिरिक्त अन्य देशांत  तेथील वापरकर्त्याना एक संदेश २० वेळा पाठवण्याची मुभा व्हाॅट्सअॅपने मुभा दिली आहे. तसेच मेसेज फॉरवर्ड करताना विचार करूनच फॉरवर्ड करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *