Saturday , July 20 2019
Home / topfive / जगभरातील युट्यूबची ठप्प झालेली सेवा पुर्ववत; युट्यूबने व्यक्त केला खेद
income generating weekend homes
YouTube-faces-global-outage-error-500-be-seen-on-screen

जगभरातील युट्यूबची ठप्प झालेली सेवा पुर्ववत; युट्यूबने व्यक्त केला खेद

नवी दिल्ली – जगातील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमींग साईट यू ट्यूबची सेवा बुधवारी बंद पडली होती. यू ट्यूब उघडताच एरर ५०० हा संदेश दिसत होता. भारत, अमेरिका, युरोप, आणि इतर देशांतूनही यू ट्यूबला ट्विटरवर आऊटेजबाबतचे संदेश मिळत होते. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यूट्यूबने याविषयी युजर्सकडून आलेल्या संदेशांसाठी आभार मानले आहेत. तसेच, यामुळे झालेल्या गैरसोयीबाबत खेद व्यक्त केला आहे. यूट्यूबने संबंधित तक्रारींचे लवकरच निवारण करण्याचे आश्वासन दिले होते. ते तातडीने पूर्ण करत सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

यू ट्यूब ओपन केल्यानंतर ‘५०० इंटर्नल सर्व्हर एरर. क्षमस्व, काहीतरी बिघडले आहे. चांगले प्रशिक्षण दिलेल्या माकडांची टोळी या अडचणीचा सामना करण्यासाठी पाठविली आहे. तुम्हाला त्यांच्यापैकी कोणी दिसले, तर त्यांनाही ही माहिती पाठवा. (त्यांना स्क्रीन शॉटसची भीती वाटते.)’ असा संदेश दिसत होता.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *